सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर विनोद लोखंडे) : मुगा काळे रा. बचेरी ता.माळशिरस यांनी त्यांच्या दोन जर्सी गाय व एक म्हैस अश्या त्यांचे शेतात बांधलेल्या असताना दिनांक १३/१२/ २०२४ रोजीचे रात्रौ ११/०० वा ते दिनांक १४/१२/२०२४ रोजी चे पहाटे ०२/०० वा चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेल्या आहेत वगैर प्रमाणे फिर्याद दिलेने माळशिरस पो लीस ठाणे गुरनं ५७५/२०२४ बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदर गुन्हयाचा तपास करणेसाठी लागलीच पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोधासाठी गुन्हयाचे तपासिक अंमलदार पोलीस नाईक दत्ता खरात यांना सूचना दिल्या. विशेष पथक नेमुन सदर गुन्हयातील गायी व म्हैशीचा शोध घेतला असता गोपनीय बातमीदारां करवी माहीती मिळाली की, सदर फिर्यादी यांची जनावरे ही मोहोळ परीसरातील आरोपीने चोरली आहे. अशी माहीती मिळाली.
तांत्रिक माहीतीचे विश्लेषन करुन आरोपी नामे १) ज्ञानेश्वर अज्ञान खांडेकर रा गोटेवाडी ता मोहोळ जि सोलापुर २) विकास तानाजी खरात रा बचेरी ता माळशिरस जि सोलापुर यांना ताब्यात घेवुन गुन्हयामध्ये अटक करण्यात आले. सदर आरोपींकडे कसुन तपास केला असता सदर आरोपीतांनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांचेकडुन गुन्हयातील चोरीस नेलेला माल दोन जर्सी गायी व एक म्हैस ताब्यात घेण्यात आलेली आहे व सदर चोरीसाठी वापरण्यात आलेले पिक अप वाहन जप्त करण्यात आलेले आहे.
माळशिरस पोलीसांनी जनावर चोरीचा लावला छडा व दोन आरोपीना केले अटकयातील फिर्यादी हा सामान्य शेतकरी असुन त्यास गायी परत दिलेनंतर त्यांनी समाधान व्यक्त केले. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना दत्तात्रय खरात करीत आहेत. सदरची कामगीरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक लातूर ग्रामिण, प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक, नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली नारायण पवार, पोलीस निरीक्षक माळशिरस पोलीस ठाणे, पोहेकों/संतोष घोगरे, पोना/दत्ता खरात, पोकों/अजित कडाळे, सायबर शा खेचे युसुफ पठाण यांनी केली आहे.







