पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) – दौंड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील दोन दिवसांमध्ये बनावट विदेशी दारू बनविणाऱ्या धडक कारवाई करून दोन महागड्या चार चाकी वाहनांसह १९ लाख ३७ हजार ७८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरूक यांनी दिली.
सविस्तर माहिती अशी की, दौंड विभाग आणि पुणे या पथकाने दि. २२ आणि २३ रोजी महागड्या चारचाकी वाहनांमध्ये विदेशी दारूच्या बाटल्या आणि बनावट विदेशी दारू भरून विक्री करणाऱ्या या पथकाने धडक कारवाई केली. खडकी आणि राजेगाव या परिसरामध्ये महागड्या चार चाकी गाड्यांमध्ये निर्जन्य स्थळी उभ्या करून बनावट विदेशी दारू ब्रँडेड, विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या भरून सीलबंद करून विक्री करण्याचा धंदा सुरू आहे, अशी माहिती मिळाल्याने राज्य उत्पादन शुल्क, दौंड या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दोन्ही महागड्या ब्रँडेड दारूच्य बाटल्या, झाकणे यासह यासह १९ लाख ३७ हजार ७८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरूक, दिनेश ठाकूर, मयूर गाडे, संकेत वाजे, शुभम भटे, अशोक पाटील, प्रवीण सूर्यवंशी, सौरभ देवकर, केशव वामने यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास विजय रोकडे प्रदीप झुंजरूक करीत आहेत.







