सावदा (प्रतिनिधी अजहर खान) – मुक्ताईनगर येथील अल-फलाह उर्दु हायस्कूल ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांच्या सन २००९ या वर्षीच्या इयत्ता दहावीच्या बॅचच्या स्नेहमेळावा नुकताच उजनी ता.बोदवड येथील साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला सुरत, मुंबई, बुऱ्हाणपूर,या ठिकाणाहून २० विद्यार्थिनी उपस्थित होत्या. १६ वर्षांनंतर विद्यार्थी एकत्र आले होते. कार्यक्रमाची सुरुवात शाळेची प्रार्थना, प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीताने झाली.
१६ वर्षांनंतर एकत्र आल्याने खूप आनंद वाटतो आहे. शाळेच्या प्रती ऋण व्यक्त करण्याचा कार्यक्रम, शाळेचे अनुभव सांगताना अनेक मुलांचे डोळे पाणावले होते. आणि जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.कार्यक्रमा मध्ये सादिक खाटीक, रिजवान चौधरी,असलम शाह,जुबेर अली,वसीम कुरैशी,हाफीज अबुझर, हाफिज मोहसीन, वसीम काजी, एजाज अहमद,अल्ताफ मणियार,सिद्दिक शेख,हुसैन मणियार,बिलाल मणियार, इरफान मणियार,जावेद शाह, जमीर खान, कमील काजी, उमर खान,मोहम्मद सर, तौफिक काजी,सरफराज खान आदि विध्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रिजवान चौधरी आणि मित्र परिवार यांनी प्रयत्न केले.







