जळगाव जिल्हा पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर भाग अंतर्गत एकता चषक क्रिकेट स्पर्धा

एकता चषक क्रिकेट स्पर्धा

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : आज (दि.२६) मुक्ताईनगर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेमध्ये मुक्ताईनगर, सावदा, वरणगाव व बोदवड येथील पोलीस तसेच गावातील सर्व धर्मीय यांची मिळून टीमा तयार करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेमध्ये सावदा पोलीस स्टेशनच्या टीमने विजेतेपद पटकावलेले आहे.

 

सावदा पोलिस स्टेशनचा संघ उत्तम कामगिरी दाखवली. यावेळी त्यांनी आपल्या कलेचा अतिशय उत्तम वापर करून क्रिकेटमध्ये अतिशय मेहनतीने खेळण्याचे तंत्र समजून घेऊन त्याचा योग्य वापर केला. परिश्रम घेतले.परिणामी त्यांना विजय मिळाला.खेळण्याच्या बाबतीत स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे फार कठीण आहे.!पण त्यांच्या बाजूने खूप चांगला खेळ झाला.संघाला भरपूर पाठिंबा मिळाला आणि त्यांच्यामुळेच संघ जिंकला.विशाल पाटील यांचा मार्गदर्शनाखाली खेळलेला खेळ आणि मिळवलेला विजय कौतुकास पात्र होते..परिस्थिती समजून घेऊन घेतलेले निर्णय खूप चांगले होते.सर्व खेळाडूंनी आपापली जबाबदारी पार पाडत संघाला विजयापर्यंत नेले.

 

पहिली मॅच वरणगाव पोलीस स्टेशन विरुद्ध होती त्यांना 54 रणांचे टार्गेट दिले होते त्यांना 17 रनांनी हरवले. फायनल सामना मुक्ताईनगर पोलीस स्टेशन विरुद्ध होती त्यांनी 72 केले होते त्यांना पण हरवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, हेड कॉन्स्टेबल निलेश बाविस्कर, हेड कॉन्स्टेबल यशवंत टहाकळे पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील होमगार्ड निलेश खाचणे.त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here