जळगाव (संपादक सुनिल पाटील) : श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक किशोरभाऊ ढाकणे तर प्रमुख अतिथी शौय यात्रा कंपनीचे संचालक नामदेव दामू वाघ हे होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष पन्नालाल वंजारी, संस्थेचे सचिव अशोक लाडवंजारी व संस्थेचे संचालक वासुदेव सानप ,सुरेश लाड ,अरुण चाटे, अशोक वाघ ,भानुदास नाईक, विजय वाघ ,भानुदास नाईक ,भगवान लाडवंजारी , संतोष चाटे, संचालिका संध्याताई नाईक, व छाया वाघ ,आम्रपाली हिरोळे, सचिन इखे, मोहित नाईक, गजानन वंजारी चेतन सैंदाणे योगेश कोचुरे व श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिवाकर जोशी सर, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका ईश्वरी वंजारी मॅडम, या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण नामदेवभाऊ दामू वाघ यांच्या हस्ते झाले विद्यालयातील इयत्ता १ ते १० वी विद्यार्थ्यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाची माहिती दिली व देशभक्ती नृत्य गीत व गीत सादर केले भाषणात अश्फाक तडवी ,नदीम , रमजान तडवी, बेबी जाधव यांनी प्रजासत्ताक दिनाची माहिती दिली यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री किशोर भाऊ ढाकणे, प्रमुख अतिथी व ध्वजरोहक नामदेव दामू वाघ (संचालक .. शौर्य यात्रा कंपनी) यांच्या कडून अंकरा हजार रुपये (११००० ) व प्रमुख अतिथी सचिन इखे यांच्याकडून विद्यालयास मदत जाहीर करण्यात आली.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख दिनेश पाटील सर यांनी तयार केले तर सूत्रसंचालन प्राथमिक विद्यालयातील शिक्षिका सविता ठोसर मॅडम यांनी केले तसेच अशोक भाऊ लाड वंजारी यांच्याकडून बिस्किट वाटप करण्यात आले व तुलसी जेली कंपनीतर्फे तर्फे चॉकलेट वाटप, करण्यात आले. मुकेश टेन्ट हाऊस तर्फे अनमोल असे सहकार्य करण्यात आले कार्यक्रमाचे आभार अतुल चाटे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्राथमिक व माध्यमिक विद्यातील विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.







