पंढरपूर तालुक्यातील सोनके येथील श्रीनाथ विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

प्रजासत्ताक दिन

पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : आज (दि.२६) श्रीनाथ विद्यालय सोनके येथे, देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिन हा सर्व भारतीयांसाठी खूप खास आहे. १९५० मध्ये याच दिवशी भारत देशाने आपले संविधान स्वीकारले आणि देश प्रजासत्ताक बनला. भारत देशाचे संविधान लागू करण्यात आले. हे संविधान म्हणजेच आपली राज्यघटना परमपूज्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आली.

 

 

श्रीनाथ विद्यालय सोनके ता. पंढरपूर या विद्यालयांमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री. अंकुश (आण्णा) इंगोले हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले. तर प्रमुख पाहुणे म्हणून सोनके गावचे सरपंच श्री. राजू चंदनशिवे, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. पी. एल. बाबर सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. महेश इंगोले सर, माजी मुख्याध्यापक श्री. मुलाणी सर, ग्रामपंचायत सदस्य श्री. पांडुरंग हाके, श्री. तानाजी गोफणे (तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), माजी सैनिक श्री. अशोक मदने, श्री. बाबासाहेब कोळेकर (माजी सरपंच, सोनके), श्री. नवनाथ खरात (ग्रामपंचायत सदस्य, सोनके ), श्री. नितीन गायकवाड ( आर. पी. आय. पंढरपूर तालुका अध्यक्ष) ग्रामपंचायत सदस्य, पालक, माता पालक, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांचे उपस्थितीत संपन्न झाला.

 

या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम, खडे व बैठे कवायत प्रकार, डंबेल्स, विद्यार्थी भाषणे, वैयक्तिक व सामुदायिक देशभक्तीपर गीत सादर केली. वर्षभरामध्ये विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप यावेळी करण्यात आले.

 

आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. महेश इंगोले सर यांनी केले, तर सूत्रसंचलन सहशिक्षक श्री. बाळासाहेब बाबर सर यांनी केले. हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.हा राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here