माळशिरस तालुका स्तरीय समिती मार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची जनजागृती

बेटी बचाओ बेटी पढाओ

माळशिरस (तालुका क्राइम रिपोर्टर अमोल माने) : २२ जानेवारी ते ८ मार्च २०२५ या कालावधीमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेस दहा वर्ष पूर्ण होत असल्याकारणाने आज (दि.२६) उपविभागीय कार्यालय अकलूज येथे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची जनजागृती करण्यात आली.

 

यावेळी माळशिरस तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी विजया पांगरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.शिरगावकर यांच्यासह सर्व तालुकास्तरीय समिती सदस्य व प्रांत कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका यांनी बेटी बचाओ बेटी पढाव या योजनेची शपथ व स्वाक्षरी मोहीम घेतली.

 

यानंतर प्रांत कार्यालयापासून नवीन स्टॅन्ड मार्गे सदुभाऊ चौक ते प्रतापसिंह चौक मार्गे प्रांत कार्यालय या मार्गावर बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या जनजागृती पर घोषणा देत सुमारे ६३ बाईक सह ११२ अंगणवाडी सेविका तसेच विभागातील समिती सचिव बाल विकास प्रकल्पाधिकारी आस्मा आतार स्वतः व अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच समितीमधील अधिकारी कर्मचारी महिला यांनी बाईक रॅलीमध्ये सहभागी होऊन जनजागृती केली. स्त्रीभ्रूणहत्या थांबवावी तसेच लिंग गुणोत्तर वाढवण्यासाठी विविध प्रयत्नांच्या उपक्रमांची अंमलबजावणी चोखपणे करण्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन माळशिरस बालविकास प्रकल्प अधिकारी आस्मा आतार व अकलूज बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लाडवाड यांनी नियोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here