एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीतर्फे शहीद अब्दुल हमीद यांना श्रध्दांजली

शहीद अब्दुल हमीद

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी शेखपुरा भागातील शहीद अब्दुल हमीद स्मारकावर चक्र अर्पण करुन श्रध्दांजली देण्यात आली. एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने १४ वर्षांपासून श्रद्धांजली अर्पण करण्यात येते.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की सावदा येथील शेक प्रभागात २६ जानेवारी रोजी शहीद अब्दुल हमीद स्मारकवर चक्र अर्पण करण्यात आले.

 

यावेळी सावदा पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सर, नगरपालिका मुख्याधिकारी भूषण वर्मा,तसेच माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी गटनेते नगरसेवक फिरोज खान पठाण, माजी उपनगराध्यक्ष नंदाबाई लोखंडे, माजी नगराध्यक्ष अनिताताई येवले, माजी नगराध्यक्ष रेखाताई वानखेडे,भावी नगरसेवक विशाल तायडे, माजी नगर सेविका करुणा पाटील, माजी नगरसेविका सुभद्राबाई बळगे, तसेच शकिल भाई, साबीर कुरैशी, इरफान मियां, नासिर भाई तसेच शहिद अ हमीद एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी चे अध्यक्ष मुख्तार शेख सचिव फिरोज खान कादर खान खजिनदार अमजद खान अय्युब खान, सलिम खान समसेर खान व परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here