पन्हाळा (प्रतिनिधी अनिल सांगळे) : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांचे कुलदैवत श्री जोतिबा देवांचे सोमवारी (दि.२७) सपत्नीक दर्शन घेतले.
सकाळी ११ वाजता त्यांचे व महाराणी साहेब,व राजे युवराज यांचे मंदिर परिसरात आगमन झाले, या वेळी गावातील महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले , त्यानंतर त्यांचे वंशपरंपरागत मिटके पुजारी (केळीचा वाडा) यांच्या सोबत विधीपूर्वक मंदिरातील सर्व देव देवता सहित कुलस्वामी श्री जोतिबा देवांचे दर्शन घेतले.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या घराण्याचे कुलदैवत असणारे श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे सिंधिया देवस्थान ट्रस्ट ग्वालियर संस्थान, वाडीरत्नागिरी कार्यालय मंदिर परिसरात असून त्या मार्फत दररोज श्री जोतिबा देवांना अभिषेक, नेवैद्य पूजा अर्च्या केली जाते, त्यासाठी संस्थान कडून कर्मचारी सेवेत आहेत,आज राजे श्री. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते ,श्री. श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार यांच्या फोटोचे अनावरण केले.
याप्रसंगी, पन्हाळा प्रांत श्री समीर शिंगटे, श्री शिवराज नायकवडी सचिव(पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर),श्री धैर्यशील तिवले,(ऑफिस इंनचार्जे केदारलिंग देवस्थान वाडीरत्नागिरी),श्री.अजित झुगर (ऑफिस इंनचार्जे सिंधिया देवस्थान ट्रस्ट,वाडीरत्नागिरी) ग्वाल्हेर संस्थान पदाधिकारी, पुजारी , व ग्रामस्थ उपस्थित होते.







