विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या मान्यवरांना वऱ्हाडरत्न पुरस्कार जाहीर

वऱ्हाडरत्न पुरस्कार

अकोला (जिल्हा क्राइम रिपोर्टर संजय वाट) : बार्शीटाकळी शहरातील प्रभु पार्वती मंगल कार्यालय येथे संपन्न होणाऱ्या वऱ्हाडी साहित्य व बोलीभाषा संवर्धन संस्था बार्शीटाकळी यांच्याकडून दरवर्षी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व विशेष कामगिरी करतं असलेल्यांना त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून पुरस्कार दिल्या जातात. या मध्ये वऱ्हाडी साहित्य व वऱ्हाडात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे यंदाही पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

 

संजय वाट व श्याम ठक यांनी जांब वसू येथील तथाकथित गौण खनिज उत्खनन प्रकरणाची विशेष बातमी लावुन,त्या प्रकरणाकडे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमतीअरोरा मॅडम यांचे लक्ष वेधल्याने, त्यांनी मौका पाहणी करून दोन गरीब शेतकऱ्यांचा सुमारे १२लक्ष ९२ , हजार रुपयांचा दंड रद्द करण्यात मोठी भूमिका निभावली होती. संजय वाट हे सध्या व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष आहेत.

 

यात जेष्ठ वऱ्हाडी साहित्यिक आबासाहेब कडू ( अमरावती) यांना जीवनगौरव २०२५ युवा वऱ्हाडी साहित्यिक अजय इंगळे ( पळसो बढे) यांना “यलाई” पुष्पराज गावंडे पुरस्कार , वऱ्हाडी साहित्यिका सौ. अश्विनी घुले यांना स्व. सौ.सुमनबाई ठक स्मृतीप्रित्यर्थ महिला वऱ्हाडरत्न पुरस्कार , बार्शीटाकळीचे पत्रकार संजय वाट यांना वऱ्हाडरत्न (पत्रकारिता क्षेत्र) हरिदास रत्नपारखी यांना वऱ्हाडरत्न (समाजसेवा) , डॉ.प्रा.सुनील पखाले वऱ्हाडरत्न (साहित्य सेवा)पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. सदर पुरस्कार यावर्षी दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजी बार्शीटाकळी येथे होत असलेल्या, सहाव्या अखील भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे.

 

यावर्षीचा पत्रकारिता क्षेत्रातील वऱ्हाडरत्न पुरस्कार दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधि व गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ उत्तमप्रकारे पत्रकारिता करत असलेल्या संजय महादेव वाट यांना जाहीर झाला आहे. त्यांना जाहिर झालेल्या पुरस्काराबद्दल, त्यांच्यावर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here