कामाच्या वादातून हॉटेल कामगाराचा सुरीने गळा कापून खून

murder
file photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : हॉटेलमध्ये काम करीत असलेल्या कामाच्या वादातून एका कामगाराने स्वयपांकी असलेल्या विजय विनायक पांचाळे (वय ३५, रा. हॉटेल ऐश्वर्या बार अँड रेस्टॉरंट कामगार खोली, खराबवाडी, मुळ रा. अमरावती) या कामगाराच्या गळ्यावर भाजी कापण्याच्या सुरीने वार करुन त्याचा खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी उदय प्रकाश गिरी (वय ३५) याला ताब्यात घेतले आहे. ही घटना खराबवाडीतील हॉटेल ऐश्वर्या बार अँड रेस्टॉरंट येथील कामगारांच्या खोलीत शुक्रवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय पांचाळ हा स्वयंपाकी म्हणून हॉटेल ऐश्वर्या बार अँड रेस्टॉरंट मध्ये कामाला होता. उदय गिरी हाही तेथेच काम करतो. ते दोघेही सकाळी खोलीमध्ये असताना कामाच्या वादातून त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा उदय याने भाजी कापायच्या सुरीने विजय याच्या गळ्यावर वार केले. त्यात विजय हा गंभीर जखमी होऊन त्यातच त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच महाळुंगे एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी उदय गिरी याला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी सांगितले.

 

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस अंमलदार राजकुमार हनुमंते, यदु आढारी, सचिन मोरे, सागर जैनक, त्रिनयन बाळसराफ, संदीप सोनवणे, प्रदीप राळे, विठ्ठल सानप, योगेश कोळेकर, सुधीर दांगट, समीर काळे, शशिकांत नांगरे, राहुल सूर्यवंशी, मनोज साबळे यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here