भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

भारतीय विद्या भवन

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ तबला वादन आणि ओडीसी नृत्य ‘ कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता. शताब्दी मलिक (पश्चिम बंगाल) यांनी ओडीसी नृत्य सादर केले. तर जिग्नेश शेठ (गुजरात) .यांनी तबला वादन केले.हा कार्यक्रम इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स चे पुणे विभागीय कार्यालय आणि ‘ शिलीम इनस्टिट्यूट ‘ यांनी प्रस्तुत केला.हा कार्यक्रम शनीवार,दि.८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) सभागृहात झाला.

भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे, इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स चे पुणे विभागीय कार्यालयाचे अधिकारी सुदर्शन शेट्टी, ‘शिलीम इनस्टिट्यूट ‘च्या कला आणि सांस्कृतिक विभागाच्या संचालक डॉ. मंजुषा सुरखिया आणि कलाकारांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. योगेश रांगणेकर यांनी सूत्रसंचालन केले.

जिग्नेश शेठ (गुजरात) यांनी तबला वादनाने सुरूवात केली. त्यांनी त्रिताल, परन आदी पारंपारिक रचना सादर केल्या. त्यांना हार्मोनिअमवर उमेश पुरोहित यांनी साथसंगत केली. त्यानंतर जिग्नेश शेठ यांनी गिटार आणि ढोलकी यांची जुगलबंदी सादर केली. ‘ जॉय ‘ असे या प्रस्तुतीचे नाव होते ही रचना जिग्नेश शेठ यांनी तयार केली होती. शिलीम इनस्टिट्यूटचे ‘ लोणावळा येथील स्थानिक कलाकार भीमराव शिंदे , वैभव कडू यांनी त्यांना ढोलकीवर साथ केली.

शताब्दी मलिक (पश्चिम बंगाल) यांनी ‘शिलीम इनस्टिट्यूट’ लोणावळा येथील विद्यार्थीनी आदिती चोरघे, नेत्रा चोरघे, आर्या गोनाटे, वैष्णवी आखाडे, कार्तिकी गोनाटे, आर्या दरेकर, श्रावणी चोरघे,धनश्री गोनाटे, चैताली गोनाटे यांनी ‘गुरु ब्रम्हा गुरू विष्णू ‘या मंगला चरण वंदनेने नृत्याची सुरुवात केली. यानंतर शताब्दी मलिक यांनीअभिनय प्रस्तुती केली. जिग्नेश शहा यांनी तबला आणि गीतातून साथ करून शताब्दी मालिक यांनी ओडीशी नृत्य प्रस्तुतीतून रामभजन सादर केले. कार्यक्रमाची सांगता ‘ मोक्ष ‘ या नृत्य प्रस्तुतीने झाली.

ज्येष्ठ जलतरंग वादक मिलींद तुळाणकर या कार्यक्रमाला उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कलाकारांचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम विनामूल्य होता. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा २३४ वा कार्यक्रम असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here