श्री विश्वकर्मा जयंती उत्सव – २०२५ श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशन जळगाव महाराष्ट्र सुतार समाजातर्फे ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांचा जाहीर सत्कार

श्री विश्वकर्मा जयंती उत्सव

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर विनोद पाटील) : गेल्या आठ दिवसाला गणेश नगर,सब जेलच्या पाठीमागे,जळगाव शहर. येथे गेल्या ५२ वर्षापासून राहत असलेले वृद्ध सुतार दांपत्यांच्या घरावर जळगाव शहर मनपा अतिक्रमण विभागाने जळगाव मनपात वरिष्ठ लिपिक असलेला शर्मा नामक व्यक्तीला सदर जागा हडप करता यावी यासाठी अमानुष पद्धतीने एकतर्फी निकालातून अतिक्रमणाची कारवाई केली होती.या विरोधात ॲड.पाटील यांनी आवाज उठवत सदर वृद्ध सुतार दांपत्यांचे घर स्व.नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठान च्या माध्यमातून सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत पुन्हा त्या ठिकाणी घर बांधून दिले होते.याबद्दल श्री.विश्वकर्मा जयंती उत्सव २०२५ श्री.विश्वकर्मा युवा फाउंडेशन, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. तर्फे ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील व मित्रपरिवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर जळगाव शहर मनपा माजी महापौर सौ.सीमाताई भोळे,संस्थापक अध्यक्ष – श्री हर्षल सूर्यवंशी, सचिव – शरद बोरसे, उपाध्यक्ष – श्री चंद्रकांत तायडे, कार्याध्यक्ष – श्री यशवंत कापडे, खजिनदार – श्री किशोर बोरसे, कायदेशीर सल्लागार – एडवोकेट ललित तायडे, संघटक – श्री किरण खैरनार, सहसचिव – श्री निलेश देवरे, आदि पदाधिकारी समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी समाजातील विविध ज्येष्ठ – श्रेष्ठ मंडळींनी स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आदरणीय अण्णा देखील समाजाच्या पाठीशी अशाच खंबीर पद्धतीने उभे राहून अन्यायाच्या विरोधात लढा देत असत म्हणून अनेक आठवणी सांगितल्या तसेच पियुष देखील स्व.नरेंद्रअण्णा यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत असल्याचा दाखला दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here