अंकलेश्वर – बुरहानपूर राष्ट्रीय महामार्ग प्रगतीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची आढावा बैठक

रक्षाताई खडसे

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : आज (दि.११) केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री तसेच रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार, यांनी नवी दिल्ली येथील शास्त्री भवनातील आपल्या दालनात न्हाई अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.

 

या बैठकीत त्यांनी अंकलेश्वर – बुरहानपूर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचा आढावा घेतला. हा महामार्ग महाराष्ट्र, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून जाणारा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग असून, दळणवळण सुधारण्यासाठी महत्त्वाचा आहे.

 

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी अधिकाऱ्यांना हा महामार्ग रावेर तालुक्यातून वळवण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरून कृषी उत्पादनांसाठी, विशेषतः येणाऱ्या केळी क्लस्टरसाठी, व्यापार आणि वाणिज्याच्या संधी वाढू शकतील. मंत्री महोदयांनी प्रकल्पाच्या डिझाईनच्या अंतिम रूपाला गती देण्याची तसेच जमिनीच्या अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्याची आवश्यकता असल्यावर भर दिला. या बैठकीला न्हाई भोपाळचे प्रादेशिक अधिकारी आर. पी. सिंग आणि जळगाव येथील प्रकल्प अधिकारी शिवाजी पवार यांनी दूरस्थ उपस्थिती दर्शवली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here