एरंडोलमधील अवैध गॅस भरणा केंद्रावर पोलिसांचा छापा; ८ गॅस सिलेंडर जप्त

crime
file photo

एरंडोल (महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार ॲड. दिनकर पाटील) : येथे वाहनात अवैधरित्या गॅस भरणा करणाऱ्या एकास त्याच्या मशिनिसह बाळगताना मिळून आल्याचे एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

याबाबत एरंडोल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार धरणगाव रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम आपल्या स्वतः च्या फायद्यासाठी घरगुती गॅस सिलेंडर मधून अवैधरित्या विनापरवाना वाहनांमध्ये गॅस भरणा करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांना मिळाली. तात्काळ कारवाई करत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत तिथे छापा टाकला.

 

यावेळी मंगेश नगराज महाजन (वय १९) रा.बालाजी मढी जवळ,एरंडोल हा ८ हजार किमतीचे ४ इंडेन कंपनीचे गॅस सिलेंडर ,४ हजार रुपये किमतीचे ४ रिकामे भारत गॅस कंपनीचे गॅस सिलेंडर तर १० हजार रुपये किमतीचे गॅस सिलेंडर मधून वाहनात अवैधरित्या गॅस भरण्याकरिता वापरण्यात येणारी मशीन त्यात गोल्ड पावर कंपनीची १ एच.पी.ची निळ्या रंगाची मशीन व १ काळया व १ पिवळ्या रंगाची नळी व सोबत लाल रंगाची मशीन असा अंदाजे २२ हजार अंदाजे किंमत असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

पंचासमक्ष मंगेश याने आपण सदर मशिनीच्या साहाय्याने विविध कंपनीच्या घरगुती वापरासाठी असलेल्या सिलेंडर मधील गॅस मशीनच्या साहाय्याने व्यावसायिक वापरासाठी अवैध रीतीने खाजगी वाहनात भरून देतो असे सांगितले.एरंडोल पोलीस स्टेशनला पोलीस नाईक सचिन पाटील यांच्या फिर्यादवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर धाड पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ.कपिल देव पाटील,विलास पाटील,पो.ना.सचिन पाटील यांनी टाकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here