अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे निधन

आचार्य सत्येंद्र दास

अयोध्या (उत्तरप्रदेश) : येथील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे बुधवार (१२ फेब्रुवारी) रोजी निधन झाले. रुग्णालयाने याबाबत माहिती दिली. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांच्यावर लखनऊच्या पीजीआयमध्ये उपचार सुरू होते.

 

रुग्णालयाने जारी केलेल्या प्रेस विज्ञप्तीत असे म्हटले आहे की, अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी श्री सतेंद्र दास जी यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ३ फेब्रुवारी रोजी त्यांना स्ट्रोक आल्यानंतर गंभीर अवस्थेत न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आचार्य सत्येंद्र दास यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आचार्य सत्येंद्र दास ३ फेब्रुवारीपासून रुग्णालयात दाखल होते.

 

एसजीपीजीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘श्री सत्येंद्र दास जी यांना पक्षाघाताचा झटका आला आहे. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता आणि सध्या त्यांना न्यूरोलॉजी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. पीजीआय प्रशासनाचे पीआरओ म्हणाले की, त्यांनी सकाळी पीजीआयमध्ये अखेरचा श्वास घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here