धरणगाव (प्रतिनिधी विनोद पाटील) : विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्वाची असणाऱ्या बारावी परिक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाला गालबोट लागले आहे. धरणगाव केंद्रावर दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळल्याने त्याांच्यावर कारवाई करण्यात आली.
मंगळवारी (दि.११) बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. ८१ केंद्रातून ४७ हजार ६६७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर असताना योग्य ती खबरदारी घेऊनही धरणगाव येथे दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या पथकाने धरणगाव येथील केंद्र क्रमांक ७९५ वर दोन विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.







