नोकरी देण्याचे आमिष दाखवत सोलापूरच्या उद्योजकाचा मुंबईच्या तरुणीवर अत्याचार

rape
file photo

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : येथील संस्थेत नोकरी देतो, असं प्रलोभन दाखवून मुंबईच्या महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप प्रसिध्द उद्योजक शिंगवी यांच्यावर आहे. त्यांच्यासह रेखा आणि शिलवंती या दोन महिलांवरही अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच पीडितेविरुद्धही एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील एका संस्थेत अधीक्षक पदावर नोकरी लावतो, असे सांगून आरोपी शिंगवी याने महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. संस्थेतील अन्य दोन महिलांनी पीडितेला धार्मिक कारणावरून हीन वागणूक दिली असा आरोप पीडित महिलेने केला आहे. मूळची मुंबईच्या असलेल्या या पीडित महिलेच्या तक्रारीवरून या तिघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६९ आणि ॲट्रॉसिटी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पीडित महिलेला संस्थेच्या कामातून काढण्यात आलेले होते. तरी देखील ही महिला संस्थेत अवैधरीत्या राहत होती. कामावर पुन्हा घ्या, नाहीतर तुमच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी वारंवार देत एक कोटी रुपयांची खंडणी पीडित महिलेने मागितल्याचा आरोप शिंगवी यांनी केला आहे. शिंगवी यांच्या फिर्यादीनुसार पीडित महिलेवर देखील खंडणी मगितल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

 

या प्रकरणात एकमेकांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी फिर्यादीच्या म्हणण्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. दोन्ही प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी दिली आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here