पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वतीने नवीन कायदे विषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

पंढरपूर तालुका पोलीस

पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील लोटस महाविद्यालय या ठिकाणी शेवटच्या डिग्री वर्षातील विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व शिक्षक वर्ग मुख्याध्यापिका मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवीन कायदे बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

 

या कार्यशाळेत भारतीय न्याय संहिता 2023 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 भारतीय साक्ष अधिनियम 2023 याबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले तसेच पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गावचे पोलीस पाटील प्रतिष्ठित नागरिक सरपंच ग्रामपंचायत सदस्य वेगवेगळ्या क्षेत्रातील बँक क्षेत्रातील बँक मॅनेजर यांना समक्ष बोलावून नवीन कायद्याविषयी कार्यशाळा घेऊन माहिती देण्यात आली.

 

सदरचे नवीन कायदे मार्गदर्शन कार्यशाळा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सोलापूर ग्रामीण माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here