दिव्यांगाचा अपमान केल्याबद्दल गटविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

दिव्यांगाचा अपमान

पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : पंढरपूर गट विकास अधिकारी सुशील सासरे ग्रामसेवक यांनी दिव्यांग बांधवाचा अपमान केल्याबाबत दिव्यांग कायदा 2016 कलम 92 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी दत्तात्रय चौगुले यांनी निवेदन दिले आहे.

 

 

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मी दत्तात्रय महादेव चौगुले . राहणार ईश्वर वाटर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून प्रहार अपंग क्रांती जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत असून . दिनांक १२/२/२०२५. गटविकास अधिकारी यांना पत्राद्वारे मला सर्व ग्रामसेवक यांच्यासोबत दिव्याचा 5% निधी खर्च संदर्भात चर्चा करण्या साठी शेतकी भवन पंढरपूर येथे दुपारी १.०० वाजता या मीटिंग दरम्यान माझ्या मोजक्या दिव्यांग पदाधिकाऱ्यांसह मिटींगला पोचलो असता मीटिंगमध्ये दिव्यांग पाच टक्के वाटप निधीमध्ये असल्याचे माझ्या निदर्शने आल्याने मी गट विकास अधिकारी यांना तालुक्यातील माझ्या प्रश्नाचे निराकरण सांगितले.

 

 

ग्रामसेवक संघटनेचा जिल्हाध्यक्ष शरद भुजबळ भोसे ग्रामसेवक हेही त्या ठिकाणी उपस्थित होते सदर प्रश्नाचे उत्तर त्यांना श्री भुजबळ यांनी सर्व ग्रामसेवकाबरोबर घेऊन अपंग संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा अर्वाच्या भाषा वापरून अपमान केला . तसेच ग्रामसेवक सतीश चव्हाण करकंब. याने इथून पुढे लंगड्या पांगळ्यांची कामे करायची नाही अपंग लय माजलेले आहेत. अशाप्रकारे वक्तव्यात करून अपंगाला सार्वजनिक ठिकाणी अपमानित केले. तरी गट विकास अधिकारी सुशील सासरे व ग्रामसेवक शरद भुजबळ सतीश चव्हाण कृष्णा नवले यांच्या वरती दिव्यांग कायदा 2016 कलम 92 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा. जर गुन्हा दाखल झाला नाही तर संघटनेच्या वतीने जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here