सेऊल (वृत्तसंस्था) : एका एक्सप्रेसवे बांधकामाच्या ठिकाणी मंगळवारी (२५ फेब्रुवारी) एक पुलाचा एक भाग कोसळला. यामुळे दोन नागरिकांचा मृत्यू आणि पाचजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण कोरियाच्या अनसेओंगमध्ये धुराचे मोठे ढग हवेत दिसले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ही घटना सियोल पासून ६५ किलोमीटर अतंरावर असलेल्या दक्षिण भागातील अनसेओंग भागांत घडली. स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.३० च्या सुमारास दुर्घटना झाली. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार जण गंभीर जखमी झाले असून एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा तीन शोध प्रशासनाने सुरु केला आहे.
बचाव पथकाने जखमी झालेल्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राष्ट्रपती चोई सांग मोक यांनी बचाव पथकाला कार्य सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी इतर नागरिकांनी परिसरात न जाण्याचे आवाहन केले आहे.







