नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
अध्यक्ष निवृत्ती गारे पाटील, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस सुधाकर मोगल यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिष्टमंडळाने निफाड तालुका अध्यक्ष गजानन आबा घोटेकर .सिन्नर तालुका अध्यक्ष आत्माराम पगार. यांच्यासह खासदार राजु शेट्टी यांची भेट घेऊन कांदा व संपूर्ण कर्ज माफी संदर्भात चर्चा केली. धनदांडग्या उद्योगपती प्रमाणे कर्ज राईट ऑफ करण्यात यावे. या संदर्भात त्यांच्या निवासस्थानी चर्चा घडवून आणली तसेच तात्काळ राज्य व केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क मागे घ्यावे,चालू वर्षी कांद्याच्या लागवडीत क्षेत्रात 30 टक्क्यांनी वाढ झाली असून चालू वर्षी उन्हाळ कांद्याच्या हंगामात वातावरणातील गारवा व स्वच्छ हवामानामुळे कांद्याच्या उत्पादनामध्ये 30% ने वाढवणार असून .या विषयाची केंद्र व राज्य सरकारने दखल घ्यावी व कांद्याच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.
कांदा प्रश्नावर शासनाने दिलासा न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रात कांद्याच्या प्रश्नावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तिव्र आंदोलन उभे करून कृषी मंत्री, सहकार मंत्री यांच्या घरासमोर कांदे ओतून निषेध आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी सांगितले आहे, प्रतिक्रिया््आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खा. राजु शेट्टी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या ही बाब स्वागतार्ह आहे, भविष्यात कांद्याचे बंफर उत्तपादन होऊन कांद्याचे भाव कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन वेळीच केंद्र सरकारने तातडीने निर्यात शुल्क माफ करून निर्यातीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात कांद्याचे भाव गडगडले तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तिव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिकचे समन्वयक कुबेर जाधव यांनी दिली.







