निसर्गाच्या सान्निध्यात खवय्यांसाठी पर्वणी; देवळा येथे शुद्ध शाकाहारी ‘हॉटेल न्यू कुबेर’चा दिमाखात शुभारंभ!

हॉटेल न्यू कुबेर

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) | कळवण-देवळा राज्य महामार्गावरील निवाणे येथे अल्पावधीतच खवय्यांच्या पसंतीस उतरलेल्या प्रसिद्ध ‘हॉटेल कुबेर’च्या यशानंतर, आता देवळा परिसरातील नागरिकांसाठी राष्ट्रीय महामार्गावर ‘हॉटेल न्यू कुबेर’ची नवी शाखा दिमाखात सुरू झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग ७५३ लगत, गुंजाळवाडीजवळ आणि कन्यादान मंगल कार्यालयासमोर भव्य जागेत सुरू झालेल्या या शुद्ध शाकाहारी हॉटेलचे विधिवत उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.

गणेश विसर्जन पार पडल्यानंतर २६ सप्टेंबर रोजी सकाळी विधिवत गणेशपूजन व श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली. त्यानंतर गुंजाळनगर येथील ‘के. के. एंटरप्रायझेस’चे संचालक के. के. आहेर यांच्या शुभहस्ते फीत कापून हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले.
निवाणे येथील ‘हॉटेल कुबेर’ने आपल्या उत्कृष्ट चव, सात्त्विक अन्न आणि कौटुंबिक वातावरणाच्या जोरावर कळवण व देवळा परिसरातील नागरिक, कुटुंब, मित्रपरिवार तसेच सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांमध्ये खास स्थान निर्माण केले आहे. ग्राहकांचा हाच वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन संचालक धर्मा आहेर व माणिक भामरे यांनी देवळा येथे निसर्गाच्या सान्निध्यात प्रशस्त व आरामदायी बैठक व्यवस्थेसह ही अत्याधुनिक शाखा सुरू केली आहे.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव, जाणीव पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब पगार, हॉटेलचे संचालक धर्मा आहेर, माणिक भामरे, कविता भामरे, प्रवीण आहेर, संतोष भामरे, दिलीप आहेर यांच्यासह देवळा व कळवण परिसरातील सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here