डॉ. गोरक्ष धोत्रे यांची युगांडाच्या ‘ग्लोबल ॲम्बेसेडर’पदी नियुक्ती; कामगार, माध्यम व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

डॉ. गोरक्ष धोत्रे

मुंबई (संपादक सुनिल पाटील) | माध्यम व चित्रपट क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव तसेच कामगार आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेत, ‘डायस्पोरा केअर ग्लोबल इनिशिएटिव्ह, युगांडा’ (Diaspora Care Global Initiative, Uganda) या संस्थेच्या भारतासाठीच्या ग्लोबल ॲम्बेसेडरपदी डॉ. गोरक्ष सदाशिव धोत्रे यांची निवड करण्यात आली आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित एका विशेष समारंभात संस्थेचे डायरेक्टर नीरज विश्वकर्मा यांच्या हस्ते डॉ. धोत्रे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. डॉ. धोत्रे यांनी देशात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपट, माध्यम आणि कामगार वर्गाच्या हक्कांसाठी, कल्याणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या याच सामाजिक बांधिलकीची व मानवतावादी कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नव्या भूमिकेतून ते भारतात वास्तव्यास असणाऱ्या किंवा भारतात येणाऱ्या युगांडन नागरिकांना (डायस्पोरा) आरोग्यसेवा, शिक्षण, व्यवसाय, गुंतवणूक आणि आवश्यक सामाजिक मदत व समन्वयासाठी सहकार्य करणार आहेत.
युगांडाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांकडून अभिनंदन
युगांडाच्या राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार व विशेष राजदूत ॲबे वलुसिंबी यांनी या नियुक्तीबद्दल डॉ. धोत्रे यांचे विशेष अभिनंदन केले. डॉ. धोत्रे यांच्या अनुभवामुळे दोन्ही देशांतील सामाजिक व मानवतावादी संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या कार्यालयाकडून या कार्यासाठी पूर्ण सहकार्य, मार्गदर्शन व समन्वय दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या कार्यक्रमास मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, भाजप कामगार आघाडीचे नेते व पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर केशव घोळवे, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव अनिल शिंदे, तसेच ज्येष्ठ पत्रकार समीर चवरकर, शुभम देशमाने, आदित्य आनंद, जगदीश वाणी आणि हेमंत ताम्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. धोत्रे यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्याडॉ. गोरक्ष धोत्रे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here