जळगाव (संपादक सुनिल पाटील) | अनंत चतुर्दशीनिमित्त शहरात निघालेल्या भव्य गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगर शाखेच्या वतीने शुक्रवारी (दि. २५) जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांच्या हस्ते मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्वागत सोहळ्यास पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. भैय्यासाहेब रवींद्र पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रमोदबापू पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा कार्यालय सरचिटणीस प्रा. वाय. एस. महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संग्रामसिंग सूर्यवंशी, कार्याध्यक्ष राजूभाऊ मोरे, महानगर कार्यालय सरचिटणीस सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, गणेशभाऊ पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पिताताई पाटील, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, जिल्हा चिटणीस ॲड. गुंजन महाजन, उपाध्यक्ष अमोल कोल्हे, डॉ. अभिषेक ठाकूर व सरचिटणीस रमेश पाटील आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मराज फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील, संग्रामसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संग्रामसिंग सूर्यवंशी तसेच उदासी आय हॉस्पिटलचे संचालक डॉ. राहुल उदासी यांनी विशेष सहकार्य केले. याबद्दल आमदार एकनाथराव खडसे, प्रमोदबापू पाटील व अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन या सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस प्रा. वाय. एस. महाजन व महानगर सरचिटणीस सुनील माळी यांनी केले. शेवटी महानगर कार्याध्यक्ष डॉ. संग्रामसिंग सूर्यवंशी, राजूभाऊ मोरे व युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.







