अलिबाग जवळ समुद्रात मच्छीमार बोटीला भीषण आग

मच्छीमार बोटीला भीषण आग

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : अलिबागमध्ये समुद्रातील एका बोटीला भीषण आग लागून या बोटीमध्ये १८-२० मच्छीमार असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अरबी समुद्रातील मच्छिमार बोटीला १० वाजेदरम्यान भीषण आग लागली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

 

अलिबाग जवळ समुद्रात मच्छीमार बोटीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. भर समुद्रात बोटीने पेट घेतला. आज सकाळी ही घटना घडली. आगीत बोट ८० टक्के जळून खाक झाली आहे.

 

बोटीवर १८ ते २० मच्छीमार असल्याची शक्यता असून, मारुती गण यांच्या मालकीची ही बोट आहे. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही, मात्र शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती. स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणली आग विझविण्याचे काम सुरू आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here