रावेर (तालुका क्राइम रिपोर्टर नगीन इंगळे) : शहरातून जाणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपुर महामार्गावर खानापूर गावानजीक असलेल्या साखर कारखान्याजवळ बस व मोटरसायकल यांचा भीषण अपघात होऊन त्यात ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
रावेर शहरापासून १२ किमी अंतरावर असलेल्या अंकलेश्वर बऱ्हाणपुर महामार्गावरील खानापूर येथील साखर कारखान्याजवळ तालुक्यातील अटवाडे येथे जाणारी बस क्रमांक एम.एच.१४ बी.टी १७०४ व बर्हाणपुर कडून रावेर कडे येणाऱ्या विना नंबर प्लेट असलेल्या मोटर सायकलचा भीषण अपघात झाला.
या अपघातात मोटार सायकल चालक राजेंद्र भागवत घेटे (वय ३५ रा.इंदिरा कॉलनी बऱ्हाणपुर) याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.२७रोजी संध्याकाळी ७वाजता घडली. तपास पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांचे मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस करीत आहे.







