सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : ऑनलाइन गेम मध्ये हरला म्हणून पुन्हा पैसे मिळवण्यासाठी आरोपींनी चक्क दुचाकीची चोरी करून संबंधित दुचाकी विक्री करणार असल्याची माहिती वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळाली होती, ही माहिती मिळताच स्वतः पोलीस निरीक्षकांनी वडूज पोलीस स्टेशन अंकित मायणी पोलीस ठाणेकडील स्टापला बनावट ग्राहक पाठवून योग्य सापळा लावून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते . या नंतर पोलिसांनी त्या आरोपीच्या शितपीने मुसक्या आवळल्या आहेत. शुभम राजू निकम ( रा. माहुली. ता. खानापूर ) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की पो. कॉ. प्रदिप भोसले यांनी अखेर पेहराव बदलून त्यांस मध्यस्थामार्फत मोटारसायकल खरेदी करायची आहे. असे गोपनीय बातमीतील संशयित दुचाकी चोरणाऱ्या मुलासोबत खरेदीदार हा बनावट ग्राहक अथवा पोलीस असल्याचे किंचीतही संशय न येऊ देता संपर्क साधला होता, मोटारसायकल चोरणाऱ्या मुलाने सुरवातीला त्याचे ताब्यातील मोटारसायकल विक्री करण्याकरीता मायणी येथे बोलावले. त्यानंतर बनपुरी येथे बोलावले व त्यानंतर धोंडेवाडी गावाजवळ बोलावले. त्यानंतर (दि. ३१जानेवारी) रोजी संशयित मुलगा धोंडेवाडी गावी साडेबारा वाजण्याच्या सुमारांस एक मोटारसायकल स्प्लेंडर कंपनीची विक्रीसाठी घेवुन येणार होता, बनावट ग्राहक पोलीस कॉ. प्रदिप भोसले व संशयित मुलगा यांची बोलणे सुरू होताच बाजूला पंचासह दबा धरून सापळा लावून बसलेल्या साध्या वेशातील मायणी पोलीस स्टापने त्यांस मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
त्यास विश्वासांत घेवून विचारपूस केली असता संशयीत मुलाने त्यांचे नाव शुभम राजू निकम (वय २०) रा. माहुली ता. खानापूर जि. सांगली ) असे असल्याचे सांगून त्याने सदरची मोटारसायकल ही दिनांक ३०/०१/२०२५ रोजीचे रात्री तुळशीराम शिवाजी कुंभार यांच्या घरासमोरून चोरून आणली असल्याचे सांगितले. यावरून पोलीस स्टेशनचा अभिलेख पडताळी करता पोलीस ठाणे वडूज गुन्हा रजि नं ३८/२०२५ बी.एन.एस. ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात होता, सदरच्या मोटारसायकलचे वर्णन मोसा ( क्र. एम.एच.११ सी.एन ५३२२) स्प्लेंडर मोटर याप्रमाणे आहे. विक्रीसाठी आणलेली मोटारसायकल चोरीची असल्याची खात्री झाल्याने त्यांस अटक केली आहे.
त्यानंतर त्याला विश्वासांत घेवून अधिक चौकशी केली असता सदर आरोपी याने दुसरीही एक मोटारसायकल क्र. एम.एन.११ सी.पी. ०४५७ ही सातारा येथुन चोरल्याचे सांगितले त्याच्याकडून सदर दोन मोटारसाकली असा एकूण १,१५,०००/- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवा.कारंडे हे करीत आहेत. सदर आरोपी यांस विश्वासांत घेवुन तू चोरी का करतो असे विचाले असता सदर आरोपी याने सांगितले की, मी ऑनलाईन प्रोबो गेम खेळल्याने माझे फार नुकसान झाले असून मला पैसे कमी पडल्याने मी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली, सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर ,उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, स.पो.नि. विक्रांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक कदम, पो.हवा नानासाहेब कारंडे, शशिकांत काळे, आनंदा गंबरे, अमोल चव्हाण, पो.ना.प्रविण सानप, पो.कॉ. बापू शिंदे, प्रदिप भोसले, संदीप खाडे व अजित काळे व प्रियांका सजगणे आदीं पोलिसांनी कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला, सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस हवालदार नानासाहेब कारंडे हे करीत आहेत.







