धरणगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर विनोद पाटील) : येथील बेपत्ता असलेला रिल स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील (वय २२ वर्ष राहणार भवरखेडा तालुका धरणगाव) या तरुणाचा मृतदेह संशयास्पद रित्या भवरखेडे येथे गोविंद बाबा महाराज येथील नाल्यात गुरुवारी मिळून आला. सोमवार दिनांक २५ रोजी माजी सैनिक असलेल्या त्याच्या वडिलांनी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यांच्याकडे मिळून आलेले सुसाईड नोट वरून धरणगाव पोलिसांनी तपास चक्रे फिरवीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला. तो मृतदेह सहविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला असून शव विच्छेदन अहवाल आल्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे.
पोलीस अधीक्षक यांची घटनास्थळी पाहणी.
वडिलांच्या सुसाईड नोटने या प्रकरणाला वेगळेच वळण दिले आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, धरणगाव पोलीस निरीक्षक पवन कुमार देसले, यांनी पाहणी केली असून धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दोन वर्ष पूर्वी झाला होता विकीचा विवाह.
विकी उर्फ हितेश पाटील याचा दोन वर्षपूर्वी विवाह झाला होता. त्याला पाच महिन्याचा मुलगा देखील आहे त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत संशयास्पद रित्या आढळून आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांकडून कसून चौकशी करून तपास केला जात आहे.







