नवी मुंबईकरांच्या समस्यांवर नवी मुंबई जिल्हा काँग्रेस उतरली रस्त्यावर

नवी मुंबई जिल्हा काँग्रेस

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : नवी मुंबई महापालिकेचा कारभार पाच वर्षांपासून प्रशासकामार्फत चालविला जात आहे. या कालावधीत नवी मुंबईकरांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यात प्रशासक तथा आयुक्तांना अपयश आले आहे.त्यामुळे प्रशासनाचा निषेध करीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी पालिका मुख्यालया समोर हातात फलक घेऊन घोषणाबाजी करीत निषेध केला. त्याच प्रमाणे पालिकेचे उपायुक्त शरद पवार यांनी भेट घेत निवेदन दिले.

 

काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार काँग्रेस जिल्हा प्रभारी रमेश कीर यांच्या उपस्थितीत अरविंद नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निषेध आंदोलनात प्रवक्ते रवींद्र सावंत, नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष अंकुश सोनावणे, माजी नगरसेवक बाबासाहेब गायकवाड , माजी नगरसेवक दत्ता जाधव, माजी नगरसेविका पूनम पाटील,माजी नगरसेवक संतोष शेट्टी, नेरूळ तालुकाध्यक्ष तुकाराम कदम, वाशी तालुका अध्यक्ष सचिन नाईक, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष सुतार,नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महेश भंगे,नवी मुंबई अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अन्वर हवालदार, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रत्नाकर कुदळे, माजी नवी मुंबई महिला जिल्हा अध्यक्ष उज्वला साळवे, दिगंबर राऊत, दत्ता माने, तसेच काँग्रेसचे माजी लोकप्रतिनिधी, विविध सेलचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

पालिका उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात शालेय विद्यार्थी कुमार आयुष सिंग या विद्यार्थ्याच्या मृत्यू जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करावी, प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी कारवाई थांबवावी, वाशीतील रुग्णालयात नेफरोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट,न्यूरोलॉजिस्टची पदे तातडीने भरावीत, शाळेमधील रिक्त शिक्षक पदे भरावी, काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने ठेकेदारावर कारवाई करावी, सीबीडी-बेलापूर परिसरातील डोंगरावरील अतिक्रमणावर कारवाई करावी या मागण्यांची पूर्तता करण्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here