सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : मुक्ताईनगर येथील यात्रेत लोकसभेच्या प्रतिनिधी तथा केंद्रीय मंत्री यांच्या मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी व यापुढे प्रशासनाने अशा टवाळखोरांवर लक्ष ठेवावे, अशी मागणी करणारे निवेदन महिला अन्याय अत्याचार विरोधी समितीने फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष ॲड.कैलास शेडके तथा प्रदेशध्यक्ष देवाभाऊ तायडे यांनी सांगितले की, जर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड़ काढली जात असेल तर सामान्य जनतेच्या मुलींची काय अवस्था असेल. त्यांना कोण न्याय देईल. भविष्यात असा प्रकार घडू नये यासाठी कठोर कार्यवाही करण्यात यावी आणि प्रशासनाने याकडे लक्ष ठेवावे अन्यथा महिला अन्याय अत्याचार विरोधी समिति महाराष्ट्र राज्यच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, यापुढे महिलांवर होणारा अन्याय सहन करुन घेतला जाणार नाही, असा इशाराही दिला.
फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देतांना महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष ॲड.कैलाश शेडके तथा प्रदेश अध्यक्ष देवाभाऊ तायडे , सर्व राज्य पदाधिकारी, जिल्हा प्रमुख व तालुका प्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







