धुळे पोलिसांनी दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या दोघांना केले जेरबंद

घरफोडी करणाऱ्या दोघांना केले जेरबंद

धुळे (उपसंपादक प्रशांत सूर्यवंशी) : तालुक्यातील सोनगीर येथे रविवारी (दि.२ मार्च) दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या दोघांना सोनगीर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याजवळून ७२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी (दि.२) दुपारी २.२० ते ६.३० दरम्यान भूषण जीवन माळी (रा.बागुल गल्लीमागे, सोनगीर) यांच्या घरातून चोरट्यांनी ३६ हजार रुपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने चोरुन नेल्याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 40/2025 BNS क. 331(3), 305 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना सोमवारी (दि.५) स्थानिक गुन्हे शाखा धुळे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे, घरफोडी करणारे अट्टल चोरटे इरफान ऊर्फ मुन्ना मोहम्मद हसन अन्सारी (वय-४७ वर्ष, रा. चाँदतारा चौक, धुळे), जाकीर शाह भिकन शाह फकीर (वय-५० वर्ष, रा. मरकज मशिद जवळ, चाँदतारा चौक, धुळे) यांना ताब्यात घेवुन त्यांची सखोल विचारपुस केली असता, त्यांनी गुन्हयाची कबुली दिली.
त्यांच्याजवळून ३० हजार रुपयांचे कानातील टॉप्स, १२ हजार रुपयांची रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली ३० हजार रुपये किंमतीची यामाहा मोटार सायकल (क्रमांक एमएच १८ एक्यू ८४६७), लोखंडी टॉमी असा एकूण ७२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोनगीर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 40/2025 BNS क.331 (3), 305 हा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

 

आरोपी इरफान ऊर्फ मुन्ना मोहम्मद हसन अन्सारी आणि जाकीर शाह भिकन शाह फकीर हे दोन्ही दिवसा घरफोडी चोरी करणारे अट्टल चोर असुन त्यांचेवर घरफोडी तसेच चोरीचे व इतर असे एकुण २३ गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी इरफान ऊर्फ मुन्ना मोहम्मद हसन अन्सारी व आरोपी जाकीर शाह भिकन शाह फकीर दोघांनीही जिल्हा कारागृहात शिक्षा भोगलेली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनि. सचिन कापडणीस सोनगीर पोलीस ठाणे, पोउनि. रविंद्र बागुल, पोउनि अमित माळी, पोहेकॉ संदीप पाटील, पंकज खैरमोडे, तुषार सुर्यवंशी, पोकॉ. विनायक खैरनार, महेंद्र सपकाळ, सुनिल पाटील व मयुर पाटील यांनी यशस्वी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here