यावल शहरातील बांधकाम व्यवसायकाची ट्रॅक्टर ट्रॉली चोरी

पोलिस तपास शून्य तक्रारदारास उडवाउडवीची उत्तरे

यावल (सुरेश पाटील) –14 ऑगस्ट 2020 शुक्रवार रोजी रात्री यावल शहरातील बोरावल गेट परिसरातून एका बांधकाम व्यावसायिकाचे ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी झाले आहे. पोलीस तपास शून्य असून तक्रारदारास यावल पोलीस उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
शुक्रवार दिनांक 14 रोजी चोरीस गेलेले ट्रॅक्टर व ट्रॉली अज्ञात चोरट्यांनी किनगांव कडे नेल्याचे वृत्त असून यावल शहरात यावल पोलिसांनी लोकवर्गणीतून ठिक–ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत तसेच प्रत्येक पेट्रोल पंपावर सुद्धा आधीच सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वयित असताना सुद्धा अज्ञात चोरट्यांनी ते ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी करून लंपास केल्याने याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून यावल पोलीस सीसीटीव्ही कॅमेरे पाहणी करू शकत नाहीत का? तक्रारदाराने काही माहिती दिली असता यावल पोलीस त्या तक्रारदारास उडवाउडवीची उत्तरे देऊन ट्रॅक्टर कोणी चोरून नेले याची माहिती तुम्हीच द्या असे तक्रारदारास सांगत आहेत याबाबत सुद्धा यावल पोलिसांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here