सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : रावेर तालुक्यातील सावदा येथे सावदा नगरपालिका संचलित, श्री.आ.गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा या शाळेला राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या आदेशानुसार NEPE Knowledge Pvt.Ltd. Mumbai यांनी सायन्स पार्कची उभारणी करुन दिली आहे.
साहित्याच्या रक्षणासाठी पावले उचलले पाहिजे आणि साहित्यचे चोरी सारखे नुकसान होहू नये यासाठी जाळीचे कंपाऊंडची आवश्यकता आहे
सदरील सायन्स पार्क विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती साठी उपयुक्त असल्यामुळे यामध्ये असलेले मॉडेल्स ची देखभाल आणि संरक्षणासाठी सदरील सायन्स पार्कला तारेच्या जाळीचे कंपाऊंड करणे आवश्यक आहे. तरी सायन्स पार्कच्या जागेला तारेच्या जाळीचे कंपाऊड आणि छोटे गेट उभारणी करुन मिळावे ही विनंती नागरिकांनी नगरपालिका सावदा मुख्याधिकारी भूषण वर्मा यांचाकडे करण्यात आली.







