सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल मस्के) : काँग्रेस कार्यकर्त्याची कोणतीही कामे थांबू नका कामे थांबवल्यास विभागीय चौकशी लावू. असा इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी बैठकीत दिला.
खासदार शिंदे यांनी मंगळवारी (दि. ४) जिल्हा परिषद मध्ये खासदार निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे .सुरेश हसापुरे. अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी. नगराध्यक्ष चेतन नरोटे उपस्थित होते.
खासदार शिंदे म्हणाल्या जिल्हा परिषदेतून कामवाटप होत असताना आमदारांना ६० आणि खासदारांना ४०% प्रमाण ठेवावे सोलापूर लोकसभेतील विधानसभा मतदारसंघातील काही भाजपचे आमदार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामे अडवतात त्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने लक्ष घालून कामे मंजूर करण्यास सांगितले.







