अकलूज येथे बहुजन सत्यशोधक संघातर्फे ‘सामाजिक ऐक्य परिषद व कृतज्ञता पुरस्कार सोहळा’ संपन्न

सत्यशोधक संघातर्फे

सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | सध्याच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक आव्हानांच्या काळात देशाची घटनात्मक सार्वभौमता अबाधित राखणे आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, असा सूर अकलूज येथे व्यक्त झाला. बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने अकलूज येथील नवीन बसस्थानकाशेजारी असलेल्या ‘आई श्री रिसॉर्ट’ येथे ‘सामाजिक ऐक्य परिषद व कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळा’ अत्यंत उत्साहात पार पडला.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनील ओव्हाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते फेटा, शाल, पुष्पहार आणि सन्मानचिन्ह देऊन कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. यामध्ये ‘लहुजी शक्ती सेने’चे जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते आणि ‘बुलंद पोलीस टाइम्स’चे महाराष्ट्र राज्य क्राईम रिपोर्टर यांचाही सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

 हा सोहळा यशस्वी करण्यासाठी बहुजन सत्यशोधक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी असलेले सौरभ वाघमारे, प्रवक्ते महेंद्र लंकेश्वर, महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष राजकुमार लांडगे, राज्य कार्याध्यक्ष हेमंत कांबळे, नेते डॉ. विश्वास वाघमारे, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लोखंडे, तालुकाध्यक्ष विनोद लोखंडे, युवक जिल्हाध्यक्ष अवि गायकवाड आणि तालुका उपाध्यक्ष मोहम्मद शेख यांनी विशेष पुढाकार घेतला.

तसेच पांडुरंग चव्हाण, रवींद्र काकडे, अभिजित वाघमारे, अशोक कोळी, सावता नवगिरे, अण्णासाहेब पाटील, सतीश वाघमारे, अनिल सरवदे, संतोष जानराव, सचिन जावळे, संतोष वाघमारे, श्रीकांत जवंजाळ, बापू माने, सतीश ताकतोडे, उल्हास खरे, प्रकाश गायकवाड यांच्यासह सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. या परिषदेस बहुजन समाजातील नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here