सातारा (उपसंपादक लव चव्हाण) | खटाव तालुक्यातील माजी सैनिक सतीश काळे हे भारतीय सैन्य दलातून १७ वर्षे देश सेवा करून सेवा निवृत्त झाले आहेत व ते सध्या वाकेश्वर तालुका खटाव येथे राहत आहेत व शेती करत आहे.त्यांचा शेत जमीन गट नंबर ४०८ असून तो स्व मालकीचा आहे. व सदर गटाच्या सर बांधावरून इतरांना तिन्ही बाजूने (उत्तर, पश्चिम, दक्षिण) रस्ता देण्यात आला आहे. परंतु काही शेतक-यांना त्यांच्या जमीन लगत असणाऱ्या कालव्यावरून रस्ता असताना त्यांनी जाणीवपूर्वक माजी सैनिकाला त्रास देण्याचे हेतूने तहसीलदार खटाव यांच्या न्यायालयात केस दाखल केलेली आहे.
तहसीलदार वडूज यांनी दिनाक २५/६/२०२६ रोजी स्वतः मौजे वाकेश्वर येथे जाऊन शेत जमीन गट नंबर ४०८ ची स्थळ पाहणी व पंचनामा केला आहे व त्या पंचनाम्यात लिहिले आहे की अर्जदार श्रीमती रुक्मिणी शिवाजी फडतरे वगैरे १५ जण यांना त्यांच्या क्षेत्रात जमिनीत जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध आहे असं स्थळ पाणी अहवाल पंचनाम्यामध्ये नमूद केले आहे.
परंतु माजी सैनिक सतीश काळे यांनी रस्ता देणेस नकार दिल्या मुळे सामनेवाले अर्जदार व इतर १५ गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती कडून माजी सैनिक व कुटुंबिय यांना धमकावत आहेत व त्यांच्या जीवितास धोका आहे व या सर्व बाबीचा मानसिक त्रास होत आहे.तरी वरील बाबीचा विचार करून मा. तहसीलदार वडूज यांनी अर्जदार यांचा अर्ज रद्द करावा असे न झाल्यास माजी सैनिक यांच्या शेतीचे अपरिमित असे नुकसान होईल व देश सेवा केलेल्या माजी सैनिक व कुटुंबिय यांच्या वर अन्याय होईल.अशी तक्रार या निवेदनात नमूद केली आहे.
यावर योग्य तो निर्णय घेऊन या सैनिकास न्याय द्यावा. माजी सैनिक सतीश काळे व कुटुंबिय यांच्या वर हल्ला, मारहान, व त्यांच्या जीवितास धोका झाल्यास शासन, प्रशासन जबाबदार राहील, व माजी सैनिक व कुटुंबीय यांच्या हक्कासाठी ना इलाजास्तव माजी सैनिक व सैनिक संघटना यांना तिरंगा ध्वज हातात घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल याला सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार राहील.असं ही निवेदनात म्हटलं आहे. निवेदनावर सैनिक फेडरेशन तालुका अध्यक्ष रामचंद्र इंगळे, उपाध्यक्ष मेजर धनाजी आमले, त्रिदल सैनिक संघटना अध्यक्ष दत्तात्रय माळी,सतीश काळे, दत्तात्रय चव्हाण हणमंत देवकुळे, दत्ता काळे, माजी सैनिक अंकुश चव्हाण, गोरख पवार, सचिन तोडकर आदींच्या निवेदनावर सह्या असून मंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, उपविभागिय अधिकारी, वडूज तहसीलदार,उपविभागिय पोलीस अधिकारी, वडूज पोलीस स्टेशन आदींना या निवेदनाच्या प्रति देण्यात आल्या आहेत.







