दहिवाडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; दुचाकीवरून धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्या इसमावर कारवाई

दहिवाडी पोलिसांची

माण (तालुका क्राइम रिपोर्टर निलेश अदसुल) | दहिवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने पोलीस पेट्रोलिंग करत असताना, पिंगळी तलावाच्या परिसरात दुचाकीवरून धारदार कोयत्यासारखे हत्यार घेऊन संशयास्पद रित्या फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून कोयता व मोटारसायकल असा एकूण ६०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध दहिवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दहिवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रहार खाडे, पोलीस हवालदार सचिन जगताप आणि पोलीस कॉन्स्टेबल नीलेश कुदळे हे खाजगी वाहनाने गस्त घाालत असताना त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक इसम पिंगळी तलावाच्या परिसरात दुचाकीवरून कोयत्यासारखे हत्यार घेऊन संशयास्पद फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संशयित इसमाला ताब्यात घेतले.

त्याची विचारपूस केली असता त्याने आपले नाव निखिल मल्हारी चव्हाण (वय १९ वर्षे, रा. दरगेवाडी, ता. माण, जि. सातारा) असल्याचे सांगितले. त्याच्याकडील हत्यार बाळगण्याचा परवान्याबाबत विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली.

सध्या सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) अन्वये शस्त्रबंदी आदेश लागू आहेत. आरोपीने या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी त्याच्या ताब्यातील मोटारसायकल व धारदार कोयता असा एकूण ६०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी निखिल मल्हारी चव्हाण याच्याविरुद्ध दहिवाडी पोलीस स्टेशनला गु.र.नं. ३४८/२०२६ नुसार शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सचिन जगताप करीत आहेत.

सदरची धडाकेबाज कामगिरी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सौ. वैशाली कडूकर, दहिवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, सपोनि चंद्रहार खाडे, पोलीस हवालदार सचिन जगताप, रामचंद्र गाडवे, पोलीस कॉन्स्टेबल नीलेश कुदळे आदींच्या पथकाने पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here