बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देणेबाबत रावेर तालुक्यातील बौध्द बांधवांनी तहसीलदार यांना दिलेले निवेदन

महाबोधी महाविहार

रावेर (तालुका क्राइम रिपोर्टर नगीन इंगळे) : बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देणे बाबत रावेर तालुक्यातील बौध्द बांधवांनी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना दिलेले निवेदन दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,बिहार येथील गया येथे भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाली या घटनेचे औचित्य साधून सम्राट अशोक यांनी ई. स. पूर्व २६० मध्ये गया येथे महाविहाराची निर्मिती केली. तेंव्हापासून हे महाविहार जगातील सर्व बौद्ध जनतेचे श्रद्धा स्थान म्हणून ओळखले जात आहे.




सन १८८० मध्ये ब्रिटिश सरकारने या महाविहाराचा जीर्णोद्धार करून तिथे विविध सुविधा उपलब्ध केल्याने नव्याने जगभरातील बौद्ध राजे, बौद्ध भिक्खू, जनता मोठ्यासंख्येने या महाविहाराला भेट देऊन नतमस्तक होऊ लागले. सन १८९१ मध्ये अनागरिक धर्मपाल यांनी या स्थळास भेट देऊन हे स्थळ बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे म्हणून तिथल्या महंतांना विनंती केली मात्र त्यांची विनंती मान्य केलिगेली नाही तेंव्हा त्यांनी’ माहाविहार मुक्ती आंदोलन’ सुरू केले.




बिहार सरकारने ‘ महाबोधी महावीहार कायदा १९४९’ पास करून नऊ सदस्यीय समिती महाविहाराच्या दैनंदिन कामकाजा करिता, त्याच्या संवर्धनाकरिता व संरक्षणा करिता नेमली व या माहाविहाराचा ताबा या समितीकडे दिला. या समितीत ४ बौद्ध व ५ हिंदु प्रतिनिधी नेमले गेले. मात्र हे महाविहार बौद्धांचे पुजास्थळ असल्याने ते पूर्णतः बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे असे बौद्ध भिख्खू संघाचे म्हणणे आहे व ते पूर्णतः रास्त आहे. याच मागणी करिता गेल्या पंधरा दिवसांपासून अनेक बौद्ध भिख्खू बुद्ध गया येथे शांततेच्या मागनि आंदोलन करीत आहेत त्या आंदोलनास आमचा पूर्णतः पाठिंबा आहे. मा. राष्ट्रपती महोदया आपणास या निवेदनाद्वारे आम्ही नम्र निवेदन करीत आहोत की, या प्रश्नी आपण बिहार सरकारला बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्या बाबत आवश्यक तो कायदा करण्या बाबत सूचित करावे. या मागणीसाठी रावेर तालुक्यातील बौद्ध बांधवांनी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन दिले आहे. 



दिलेल्या निवेदनावर बाळू शिरतुरे , ॲड.योगेश गजरे, राजेंद्र अटकाळे, रमेश तायडे, पुंडलिक कोंघे, सागर नागरे, युवराज गाढे, कांतीलाल गाढे, कैलास तायडे, जितेंद्र गाढे, जगन्नाथ तायडे, विजय अवसरमल, राहुल लहासे, जगदीश घेते, त्र्यंबक वाघ,धुमा तायडे, सावन मेढे, चंद्रकांत गाढे, धनराज घेटे, नगिन तायडे, पंकज मोरे, महेंद्र वानखेडे, प्रशांत गाढे, सुधीर सैगमिरे, पांडुरंग गाढे, आकाश ढाकणे, यांच्यासह रावेर तालुक्यातील बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here