मनवेल येथे पोळा उत्साहात साजरा

यावल (सुरेश पाटील) – तालुक्यातील मनवेल– थोरगव्हाण परीसरात कोरोनाच्या पार्शभुमीवर शेतकरी राजाने वृषभ राजाच्या पोळा सण घरीच उत्साहात साजरा केला.
अल्पपाऊस पिक परिस्थीती उत्तम व समाधानकारक असल्यामुळे शेतात राबराब राबणाऱ्या तसेच आपला खराखुरा सोबती असलेल्या वृषभ राजाच्या पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.शेतकरी राजाने आपल्या सर्जा राजाला आघोळ घालुन सजऊन मारोती मंदिरा जवळ आणुन नारळ वाहिले व कोरोनाच्या पार्शभुमीवर घरीच पुजा करुन नैवेद्य दाखविले.
सर्जा राजाला शिंगाना आकर्षक रंग देवून अंगावर रंगेबी रंगी झुला टाकुन बैलाना सजविण्यात आले.मात्र कोरोनाच्या पार्शभुमीवर पोळा शांततेत साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here