मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित खार दांडा (मुंबई) येथे प्रथमच कोळी गीत नृत्य महोत्सव ०७ ते ०९ मार्च २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आला होता.
नारळी पौर्णिमा, होळी, प्रामुख्याने कोळी समाज पारंपारिक उत्सवात कोळी नृत्य करतात. ७० ते ८० च्या दशकात सात बेटावर बसलेल्या मुंबईसह आजूबाजूच्या भागात ह्या कलेने समुद्राच्या लाटेप्रमाणे एक उसळी मारली होती. मात्र कालंतराने ही कला लुप्त होत चालली असल्याने, या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने समूह गीत नृत्य असणाऱ्या कलेला कोळी गीत नृत्य महोत्सवाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कोळीवाड्यातील कलाकरांना एक नवीन संधी मिळवून दिली.







