सुभा लक्ष्मी संस्थेचे संचालक सतीश डोळसे यांना महाराष्ट्र रेडियन्स पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र रेडियन्स पुरस्कार

जळगांव (संपादक सुनिल पाटील) : सुभा लक्ष्मी रेफ्रिजरेशन ॲण्ड इलेक्ट्रीकल सर्व्हिसेस व प्रोफेशनल ट्रेनिंग सेंटरचे संचालक सतीश भागवत डोळसे यांनी त्यांच्या अत्यंत कठीण परिस्थितीत व्यवसायाचे ध्येय ठेवून, २००७ मध्ये सुभलक्ष्मी रेफ्रिजरेशन चीं स्थापना केली आणि ग्राहकांना रेफ्रिजरेशन आणि इलेक्ट्रिकल सेवा देण्यास सुरुवात केली.

 

सलग 10 वर्षे ते गोदरेजच्या अधिकृत सर्व्हिस सेंटर पासून सुरवात करून आता ते जळगाव जिल्ह्यात आणि परिसरात बॉश, सिमेन्स, हिताची यांसारख्या जग प्रसिद्ध ब्रँडची अधिकृत सर्व्हिस सेंटर सांभाळत आहेत. आजपर्यंत त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट सेवेमुळे हजारो समाधानी ग्राहक आणि अनेक व्यापारी डीलर मिळवले आहेत. आणि भविष्यातही अशाच दर्जाची सेवा देण्याचा त्यांचा उद्देश आहे.

यासोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून सुभा लक्ष्मी फाऊंडेशन अंतर्गत 2020 मध्ये व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू करून तळागाळतील होतकरू तरुणांना प्रशिक्षण देऊन शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सुभा लक्ष्मी संस्थेचे संचालक श्री सतीश भागवत डोळसेजी यांना रेडिओ सिटी चा एक्सलन्स इन रेफ्रिजरेशन अँड इलेक्ट्रॉनिक उपकरण श्रेणीतील महाराष्ट्र रेडियन्स पुरस्कार पुणे येथील सनीज वर्ल्ड ५ स्टार रिसॉर्ट येथे मराठी सिने अभिनेत्री मुग्धा गोडसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here