अहिल्यादेवींचा स्वतः पंतप्रधान सन्मान करत असताना पंढरपूर नगरपालिका करते अपमान – माऊली हळणवर

पंढरपूर नगरपालिका

पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस हे अहिल्यादेवींचे उदत्तीकरण संपूर्ण देशभर राज्यभर करत असताना जयंती महोत्सव विविध ठिकाणी साजरा करण्याचे नियोजन करत असताना पंढरपूर शहरांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी मंजूर केलेल्या अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवन या भवनाचे तीनं कोटी रुपये कामाचे टेंडर नगरपालिकेच्या काही कामचुकार अधिकाऱ्यांमुळे केले जात नाही.

 

पंढरपूरचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी नाविन्यपूर्ण योजनेतून निधी दिला असताना पंढरपूर शहरात असणाऱ्या अहिल्यादेवी होळकर चौकाचे शुशोभीकरण करण्याचे काम गेल्या सहा महिन्यापासून नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी मुद्दाम होऊन हेतू पुरस्कृत टाळाटाळ करत असून ही दोन्ही कामे तातडीने सुरू करून 31 मे च्या जयंतीदिनी या ठिकाणी जयंती साजरी व्हावी म्हणून निवेदन देऊन मंगळवार (दि.१८) रोजी सकाळी ११ वाजल्यापासून पंढरपूर नगरपालिकेसमोर हलगी नाद आंदोलन व अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनास दिले.

निवेदन देतांना माऊलीभाऊ हळणवर, नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर प्रशांत घोडके प्रसाद कोळेकर प्रविण सलगर बालाजी बनसोडे यांचे सह समाज बांधव उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here