जळगाव जिल्ह्यात आज ४० कोरोना बाधित रुग्ण

जळगाव – जिल्ह्यात स्वॅब तपासणीसाठी आलेल्या कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल आज (दि.१६) प्राप्त झाले असून, त्यात जिल्ह्यातील ४० व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ३, भुसावळ ८, अमळनेर ६, चोपडा ०, पाचोरा २, भडगाव २, धरणगाव ३, यावल १, एरंडोल ०, जामनेर १, जळगाव ग्रामीण १, रावेर ७, पारोळा ६, चाळीसगाव ०, मुक्ताईनगर ०, बोदवड ०. यामुळे आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८५१ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here