भुसावळमधील स्थानबध्द आरोपी मुकेश भालेरावची हत्या

मुकेश भालेरावची हत्या

भुसावळ (महाराष्ट्र उपसंपादक गिरीश पवार) : भुसावळ पोलिसांनी अनेक गुन्ह्यांमध्ये स्थानबध्द केलेला आरोपी मुकेश भालेराव (वय ३२, टेक्नीकल हायस्कूलमागे, भुसावळ) याची हत्या करून मृतदेह दफन करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आला आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय असून त्यांनी काही संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे समजते.

 

 

पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली व खून उघडकीस न येण्यासाठी तापी नदीजवळील निर्जनस्थळी पुरण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हा हत्येचा गुन्हा उघडकीस आला आहे.

मयत मुकेश प्रकाश भालेराव याच्या विरोधात अनेक गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहे तर मध्यंतरी त्यास स्थानबद्धदेखील करण्यात आले शिवाय हद्दपारीची कारवाईदेखील त्याच्यावर करण्यात आली होती.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here