वेल्हाळा शिवारात दारुच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या

murder
File Photo

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) : तालुक्यातील वेल्हाळा शिवारात दारूच्या नशेत पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वेल्हाळा शिवारात किशोर पाटील (रा. सुसरी) यांची विटभट्टी आहे. या वीटभट्टीवर बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील नियाजउद्दीन शेख मन्सूर कुटुंबासह कामाला असून याच ठिकाणी ते वास्तव्यास होते. तर त्यांच्यासोबत मुलगी सना आणि जावई अजीज सलीम शेख हे देखील चार मुलांसह विटा तयार करण्याचे काम करीत होते. सर्व कुटुंब एकाच परिसरातील पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहत होते.

अजीज सलीम शेख याला दारूचे व्यसन असल्याने दारू पिऊन रोज पत्नीशी वाद घालत होता. २२ मार्चला देखील दारूच्या नशेत अजीज शेख घरी आला. यानंतर त्याने पत्नी सना (वय २५) हिला शिवीगाळ करू लागला. शेजारी असलेल्या सासूने दोघांचे भांडण ऐकून अजीज यास शांत करण्याचा प्रयत्न केला. थोड्यावेळाने वाद कमी झाल्यानंतर अजीज व सना हे दोघेजण मुलांसह झोपण्यासाठी गेले.

दरम्यान आज पहाटे सना हिची आई कामासाठी उठवायला गेल्यानंतर खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे दरवाजा तोडून पाहिले असता सना रक्तबंबाळ अवस्थेत मृत पडल्याची दिसून आली. घरातील हे दृश्य पाहून सना हिची आई व अन्य मजूर हादरले होते. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान गळा आवळून सण हिची हत्या करण्यात आल्याचा संशय असून सना हीच पती अजीज फरार आहे. त्याचा शोध पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here