तब्बल २८ वर्षांनी आले अच्युत धनाजी चौधरी विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र

अच्युत धनाजी चौधरी

जळगांव (जिल्हा क्राइम रिपोर्टर अशोक तायडे) : डोंगर कठोरा ता.यावल येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय येथील १९९६-९७ च्या बॅचेसचे विद्यार्थी विद्यार्थिंनी एकत्र येऊन सकाळी शाळेत जाऊन मुख्यध्यापक श्री नितीन झांबरे सर,श्री कुईटे सर, श्री वळींकर सर,श्रीमती सोनाली मॅडम,श्रीमती तडवी मॅडम,यांना भेटून आपला परिचय देऊन सर्व शिक्षकांचे आशिर्वाद घेऊन गावाजवळील आदिवासी पाडा डोंगरदे येथील आदिवासी मुला-मुलींना बिस्किट नाश्ता वाटप केला.
त्यानंतर कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश गुरव यांनी केले व सर्वप्रथम मयत गुरूवर्णी शिक्षक रुंद यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नंतर विद्यार्थी विद्यार्थिनींचा परिचय घेण्यात आला व छोटेखानी मेजवानी म्हणून डॉक्टर चंदन राणे यांनी आपल्या मधुर आवाजातील गाण्यातून सर्व मित्र मंडळींचे स्वागत केले.

 

तसेच डोंगरदे येथील आनंदवन दत्त मंदिर ट्रस्टचे संत महाराज श्री स्वरूपानंद महाराजांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना आपण शाळेत असतो तेव्हाचा अनुभव आणि आज रोजी चा अनुभव यात काय फरक आहे हे समजावून सांगितले त्यांच्या स्वतःच्या जीवनातील त्यांनी अनुभव सांगितले व आपण आज रोजी तुम्ही सर्व या विद्यार्थी विद्यार्थिनींचा व्हाट्सअप द्वारे ग्रुप तयार केलेला आहे तर त्या माध्यमातून कोणाच्या काही अडचणी असल्यास ह्या आपण सर्वांनी मिळून सहकार्य करायला पाहिजे असे मार्गदर्शन केले.

आजचा हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी तुषार पाटील,लीना राणे,नयनश्री पाटील,शुभांगी पाटील,श्रीकांत झांबरे,श्रीकांत भिरुड,युवराज भिरुड, अशोक तायडे,राजेंद्र पारधे,प्रसाद आढाळे,सुरेश सपकाळे,महेश भिरूड,गणेश दांडगे,गणेश जावळे, शारदा बाविस्कर,कांचन भिरुड, बिस्मिल्ला तडवी,किताब तडवी, रमजान तडवी,शेेखलाल तडवी,जुम्मा तडवी,सरवर तडवी आदींनी अनमोल सहकार्य केले.

कार्यक्रमाचे आभार कृषी अधिकारी जळगाव श्री श्रीकांत झांबरे यांनी केले.कार्यक्रम अतिशय चांगल्या उत्साहात पार पाडला कार्यक्रमाला गाणे भिडे खुर्चीचा गेम नांव जिंकणे इत्यादी खेळ खेळून मुला-मुलींनी वेळेचा अनुभव आणि आनंद घेतला तसेच जेवणाचा मेनू म्हणजेच जळगाव खान्देश मधील यावल तालुक्यातील प्रसिद्ध वांग्याची भाजी वरण आणि भाजलेली लोळगे आमसुलकढी व भात असा जेवणाचा आनंद सर्वांनी घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here