अलिशाबा खान हिचे ३० रोजे : परिसरात होते आहे कौतुक

रोजे

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : रावेर तालुक्यातील सावदा येथील रहिवासी संजरी डिजीटल स्टुडिओचे संचालक व बुलंद पोलिस टाइम्सचे सावदा येथील प्रतिनिधी यांची मुलगी अलिशाबा हिने ३० रोजे पूर्ण केले आहेत. तिच्या संयमाचे आणि विश्वासाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

 

अलिशबा खान जिल्हा परिषद शाळा सावदा तालुका रावेर यांची इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली ‌अलिशबा खान अजहर खान वयाने फक्त ७ वर्षे असलेल्या अलिशबा हिने पवित्र रमजान महिन्याचे ३० रोजे ठेवून (उपवास) अवघ्या ७ वर्षाच्या वयापासूनच अल्लाहची ईबादत नमाज,निरंक व निरंतर रोजा (ईश्वराच्या भक्ती त लीन होत) करीत तंतोतंत पालन करीत असल्याने सर्वत्र अलिशबा खान चे कौतुक केले जात आहे अलिशबा ही अजमल खानसाहब ट्रान्सपोर्टर (एमपी गुजरात रोडलाईन सावदा) यांची नात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here