भुसावळ (महाराष्ट्र उपसंपादक गिरीश पवार) : शहरातील मुस्लीम कब्रस्थानजवळ फातीया वाचत असताना डिवचल्याचा राग आल्याने, दोघांनी ३० वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना ईदच्या दिवशी सकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयीतांना अटक केली असून जखमी शेख रिजवान शेख रहिम (वय ३०, रा.जाम मोहल्ला, भुसावळ) याला जळगावातील मंगलमूर्ती रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मुस्लीम कब्रस्थानात फातीया पढत असतांना, शेख रिजवान शेख रहिम याने डिवचत धमकावल्याने दोघांनी आपल्याजवळील चाकूने शेख रिजवानच्या पाठीवर तीनवेळा चाकूचे वार केले. या हल्ल्यात रिजवान रक्तबंबाळ झाला.
अचानक झालेल्या प्रकाराने पळापळ झाली. भुसावळ बाजारपेठ पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेत शांतता प्रस्थापीत केली तर संशयीत शेख दानीश शेख असीम उर्फ माया व जकरिया शेख जुनेद शेख (दोन्ही रा.भुसावळ) यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.







