
संभल (उत्तरप्रदेश) (वृत्तसंस्था) : पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून गरीब तरुणींना जाळ्यात ओढलं जायचं. तंत्रक्रिया करताना कुटुंबातील लोकांना बाहेर उभे राहण्यास सांगितलं जायचे. त्यानंतर तंत्रक्रिया करताना तरुणींच्या गुप्तांगाची पूजन केलं जायची. तंत्र क्रिया केल्यानंतर तरुणीसोबत काय केलं जायचं, हे त्यांनाही माहीत नाही. तंत्र क्रिया केल्यानंतर तरुणींचे अश्लील व्हिडिओ तयार केले जायचे. त्यांच्या व्हिडिओची विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त जातोय. गेल्या सात ते आठ वर्षांपासून टोळी सक्रिय आहे. या टोळीने आतापर्यंत शेकडो लोकांची फसवणूक केली आहे.
एका तरुणीचं अपहरण करून तिच्यावर तंत्र क्रिया करून हत्या करण्यात येणार असल्याची सूचना पोलिसांना मिळाल्यानंतर या टोळीचा पर्दाफाश झाला. रोख पैशांचं आमिष दाखवत या टोळीकडून गरीब कुटुंबांना लक्ष्य केलं जायचं.
पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष देऊन गरीब तरुण-तरुणींचं लैंगिक शोषण केलं जायचं. टोळीचं नेटवर्क दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये पसरलं आहे. पैशांचं आमिष देऊन टोळी लोकांची फसवणूक करत होती. पोलिसांनी टोळीतील सर्व आरोपींची अटक केली आहे. तर टोळीच्या इतर सदस्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.







